जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने!
*हे जगत- जननी जगदंबे, हे भगिनी, हे पत्नी, हे सखी, हे सर्व नात्यातून व्यक्त होणारी, स्री शक्ती, मातृ शक्ती, सकलांचा उद्धार करणारी उध्दारिणी, आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्यामुळेच सदैव तुमचे ऋणी...*
आदीही तू अन, अंतही तू
चराचरातुनी व्यक्तही तू
तुजसम काही न तुजविण काही
तरी माझ्यातुनी अभिव्यक्त तू
आम्हीं फक्त भक्त देहानीच झालो.
पंचप्राणांची अनभिषिक्त तू
तुझा शोघ घेतो, राऊळी मंदिरी
कृपा करी आम्हांवर, आमची आरक्त तू
साकारले परब्रम्ह त्यासी संयुक्त तू
दाही दिशा साद घाली, प्रतिसाद तू
काय मागू आम्ही तुजला?
कैवल्याचे लेणे अन देणेही तू
*हे काव्य खूप काही शिकवून* *गेलं.* *स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्यासाठी सकारात्मक विचार व ऊर्जा या कवितेतून मिळते.*
*आज कातडीच्या रंगावरून, जाती धर्म अन वर्णावरून, पुरुषी* *अहंकारामधून, समाजाच्या प्रदूषित नजरेतून, सतत दुय्यमाचे स्थान दिलेल्या मानसिकतेतून स्त्री कडे पाहण्याच्या सर्वांचाच दृष्टिकोन सुधारत नाही याची खंतही वाटते.*
*स्त्रीशक्तीचा व मातृशक्तीचा जागर होणे गरजेचे आहे. समाजाने *घातलेल्या जोखडातून मुक्त हो!*
*अजूनही तू झोपू नकोस. उठ संघर्ष* *कर स्वतः ला सिद्ध कर.*
घे उंच तू उभारी
झोपू नकोस आता
पिले तुझी उपाशी
त्यांची तरी दखल घे
झोपू नकोस आता
ही झोप घात करते
रुजूवात शेवटाची
ही सुरुवात करते
सुरुवात तू जगाची
नांदी ही तू शेवटाची
विसरु नकोस आता
जननी तू या जगाची
*तुझ्यात खूप काही आहे. तुझ्या अस्तित्वातच साऱ्यांच अस्तित्व सामावलेलं आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळख व स्वतः च अस्तित्व सिद्ध कर! त्या साठीच जागृत हो!*
*पुन्हा एकदा जागतिक महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा!*
*✍️महेंद्र यशवंत तुपे.©*
*(स्वरचित)*









